जशपुर, छत्तीसगड मधील जनजाती कल्याण आश्रमाबरोबर मिळून पुण्यातील डॉ. अनिल परांजपे व डॉ. मेधा परांजपे यांनी वरील ओळ सत्यात उतरवली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नियोजनात असलेले डोळ्यांचे रुग्णालय आश्रमाच्या डॉ. प्रवीण म्हेत्रम व डॉ. अनिल परांजपे यांच्या अथक परिश्रमाने आज सत्यात आले. छत्तीसगड राज्यातील अतिशय दुर्गम भागात आज अद्ययावत असे Ophthalmic Clinic सुरु झाले आहे.
आणि एवढ्यावरच नाही तर आज 9 रुग्णांच्या निःशुल्क शस्त्रक्रियाही झाल्या!! शिवाय 65 ते 70 जणांच्या तपासण्याही झाल्या!!
आज दीपप्रज्वलन झाले ते नेत्रज्योतींचे!
अनेक दशकं डोळ्यांसमोर नुसता प्रकाश बघणाऱ्या आजीच्या डोळ्यांवरून जेंव्हा पट्टी काढली गेली, तेंव्हा आजीच्या चेहऱ्यावरील आनंद काहीतरी वेगळाच आशीर्वाद देऊन गेला. आपल्यासाठी अकल्पनीय अशा गोष्टींचे साक्षीदार आश्रमाचे कार्यकर्ते व डॉक्टर झाले.
इस्राइल पॅलेस्टीन बातम्या वाचत असताना अशा बातम्याही मिळत असतात ज्यामुळे समाजाबरोबर स्वतःचेही संतुलन राखता येते. मी अशा दात्यांच्या संपर्कात आहे हे माझे भाग्य!
डॉक्टर पुण्यातील कै. म. ग. तथा राजाभाऊ आचवल ट्रस्ट याचे संचालक आहेत. त्यांच्या कार्यात अजून एका मोलाच्या कामाची भर आज पडली आहे.
अखंड ज्योती चेतवून एक आरती तुझी… | छत्तीसगड मधील दुर्गम भागात Ophthalmic Clinic सुरू
