जशपूरच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या रुग्णालयात नेत्रोपचार सेवा

जशपूर, छत्तीसगढ.
12 एप्रिल 2024
छत्तीसगड जशपूरमध्ये , स्थानिकांच्या नेत्रोपचारासाठी डॉ. अनिल परांजपे, डॉ. मिहीर परांजपे आणि त्यांच्या टीमने घेतलेले प्रयत्न नक्कीच एक आदर्श उदाहरण आहे. MGRA संस्थेच्या मुख्य कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने आणि सतत प्रयत्नाने जशपूरच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या रुग्णालयात नेत्रोपचार सेवा क्लिनिक उघडण्यात ट्रस्ट ला यश आले. आणि याच उपक्रमांतर्गत स्थानिकांना १० ते १२ एप्रिल २०२४ दरम्यान आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.

या शिबिरासाठी जशपूरातील स्थानिक मेडिकल ऑफिसर डॉक्टर प्रवीण म्हेतराम यांनी टीमची मदत केली. या कालावधीत नेत्रोपचार शिबिराच्या माध्यमातून एकूण 165 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यासोबतच 16 शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या १० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

यासोबतच डॉक्टर मिहीर परांजपे यांनी जन्मजात मोतिबिंदू असलेल्या 3 ते 6 वर्षाच्या लहान मुलांची तपासणी केली. या तपासणीतून त्या मुलांपैकी ३ जणांना शस्त्रक्रियेची गरज आहे हे समजताच त्या मुलांवर तातडीने उपचार करण्यात आले. ही 3 ऑपरेशन्स पूर्णपणे भूल देऊन करण्यात आली. जशपुरमधील दवाखान्यात इतक्या लहान वयातील रुग्णांना भूल देण्याचा हा पहिलाच अनुभव होता. आणि शस्त्रक्रिया सफल पार पडावी यासाठी रायपूरहुन, ऍनेस्थेटिस्ट, डॉक्टर अनिश गोलचा यांना बोलावण्यात आले होते.

या नेत्रोपचार शिबिराच्या माध्यमातून , ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी जशपूरातील स्थानिकांना, येथील लहान मुलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असणाऱ्या गरजू रुग्णांना सहाय्य केले. त्यांच्या या एका मदतीच्या हाताने जवळपास 165 हुन जास्त रुग्णांवर सफल उपचार करण्यात आले, ज्यामध्ये मोतीबिंदू सारख्या गंभीर आजाराने देखील काही रुग्ण पीडित होते.

आजही भारतातील असंख्य गावांमध्ये, खेड्यांमध्ये आरोग्य-तपासणी दुर्लक्षित केली जाते. कधी उपचार यंत्रणेची कमतरता तर कधी डॉक्टर्स च्या उप्लब्धततेचा प्रश्न. अश्या अनेक संकटांशी आज भारतातल्या गावांमधील प्रत्येक व्यक्ती संघर्ष करते आहे. अशा गरजूंसाठी MGRA ट्रस्ट च्या माध्यमातून विविध आरोग्य शिबीरे आयोजित केले जातात.
आज या शिबिराच्या माध्यमातून MGRA ट्रस्ट, शेकडो स्थानिक रुग्णांवर उपचार करून या गरजू लोकांकडे बघण्याच्या, प्रत्येकाच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल घडवत आहे.