ता. २८ जानेवारी २०२४ | जशपूर, छत्तीसगढ
संकटसमयी धावून गरजू व्यक्तींना मदत करणे हाच सेवाधर्म बाळगून ट्रस्ट च्या अंतर्गत जशपूर, छत्तीसगढ मध्ये स्थानिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. जसे ट्रस्ट च्या नावातच आहे अगदी तसेच विद्येचा, विवेकाचा आणि विज्ञानाचा वापर करून संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर मेधा परांजपे आणि त्यांच्या टीम ने एकूण ८३ रुग्णांच्या आरोग्याची पडताळणी केली व त्यांच्यावर सफल उपचार केले. यावेळी जशपूरला एकूण २ आरोग्य शिबीर घेण्यात आले, त्यात स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
ह्या रुग्णांपैकी एक अल्सर ने पीडित होता, यामुळे त्याच्या डोळ्याला जखम झाली होती, जी जशपूर मध्ये असलेल्या मेडिकल किट्स च्या कमतरतेमुळे बरी होत नव्हती. पण त्याच्यावर सफल उपचार करण्यात डॉक्टर मेधा आणि त्यांच्या टीम ला यश मिळाले आणि आता त्या रुग्णाच्या परिस्थितीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. यासोबतच आणखी ९० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये काही रुग्णांच्या उपचारासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तर अशा ९ रुग्णांवर डॉक्टर मिहीर यांनी शस्त्रक्रिया केली. या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या सुद्धा जास्त होती, त्यातील एका मुलाच्या डोळ्यात छोटी गाठ होती त्यावर डॉक्टर अनिल यांनी सफल शस्त्रक्रिया केली.
डॉक्टर मिहीर यांनी आणखी ८ लहान मुलांची तपासणी केली. या तपासणीत असे आढळून आले कि अजून २ मुलांना शस्त्रक्रियेची ची गरज आहे.
अशा लोकांना ज्यांना स्वतःच्या आरोग्यसाठी उपचार करण्याकरिता सुद्धा वणवण करावी लागते, त्यांना मदतीचा हात देताना ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांचे डोळे आपुलकीने भरून आले होते.
एकूणच जशपूरातील या स्थानिक रुग्णांच्या परिस्थितीतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. प्रत्येक रुग्ण ट्रस्ट च्या डॉक्टर्स सोबत मिळून मिसळून राहतो, सहकार्य करतो. आज जिथे गरजू व्यक्तीस आपल्या मूलभूत अधिकारांसाठी सुद्धा लढावं लागत अश्या ठिकाणी ट्रस्ट चे कार्यकर्ते आणि हे डॉक्टर्स या पीडितांची आत्मीयतेने मदत करतात.